संपादक : आचार्य विराज शांताराम
जय जय शुद्धे । उदारे प्रसिद्धे । अनवरत आनंदे । वर्षतिये ।।१।। विषयव्याळें मिठीं । दिधलिया नुठी ताठी । ते तुझिये गुरुकृपादृष्टी । निर्विष होय ।।२।। तरी कवणातें तापु पोळी । कैसेनि वो शोकु जाळी । जरी प्रसादरसकल्लोळीं । पुरें येसि तूं ।।३।। योगसुखाचे सोहळे । सेवकां तुझेनि स्नेहाळें । सोहंसिद्धीचे लळे । पाळसी तूं ।।४।। आधारशक्तीचां अंकीं । वाढविसी कौतुकीं । हृदयाकाशपल्लकी । परियें देसी निजें ।।५।। प्रत्यग्ज्योतीचीं वोवाळणीं । करिसी मनपवनाचीं खेळणीं । आत्मसुखाचीं बाळलेणीं । लेवविसी ।।६।। सतरावियेचें स्तन्य देसी । अनाहताचा हल्लरू गासी । समाधिबोधें । निजविसी । बुझाउनि ।।७।। म्हणोनि साधकां तूं माउली । पिके सारस्वत तुझां पाउलीं । याकारणें मी साउली । न संडीं तुझी ।।८।। अहो सद्गुरुचिये कृृपादृष्टी । तुझें कारुण्य जयातें अधिष्ठी । तो सकळ विद्यांचिये सृष्टी । धात्रा होय ।।९।। म्हणोनि अंबे श्रीमंते । निजजनकल्पलते । आज्ञापीं मातें । ग्रंथनिरूपणीं ।।१०।। नवरसीं भरवीं सागरु । करवीं उचित रत्नांचा आगरु । भावार्थाचे गिरिवरु । निफजवीं माये ।।११।। साहित्यसोनियाचिया खाणी । उघडवीं देशियेचिया आक्षोणी । विवेकवेलीची लावणी । हो देर्इं सैंघ ।।१२।। संवादफळनिधानें । प्रमेयाचीं उद्यानें । लावीं म्हणे गहनें । निरंतर ।।१३।। पाखांडाचें दरकुटें । मोडीं वाग्वाद अव्हांटे । कुतर्काचीं दुष्टें । सावजें फेडीं ।।१४।। श्रीकृष्णगुणीं मातें । सर्वत्र करीं वो सरतें । राणिवे बैसवीं श्रोते । श्रवणाचिये ।।१५।। मऱ्हाठियेचां नगरीं । ब्रह्मविद्येचा सुकाळु करीं । घेणें देणें सुखचिवरी । हों देर्इं या जगा ।।१६।। तूं आपुलेनि स्नेहपल्लवें । मातें पांघुरविशील सदैवें । तरी आतांचि हें आघवें । निर्मीन माये ।।१७।। इये विनवणीयेसाठीं । अवलोकिलें गुरुकृपादृष्टी । म्हणे गीतार्थेंसीं उठीं । न बोलें बहु ।।१८।। तेथ जी जी महाप्रसादु । म्हणोनि साविया जाला स्वानंदु । आतां निरोपीन प्रबंधु । अवधान दीजे ।।१९।।
अर्जुन उवाच
एवं सततयुक्ता ये भक्तास्त्वां पर्युपासते ।
ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगवित्तमा: ।।१।।
तरी सकळवीराधिराजु । जो सोमवंशीं विजयध्वजु । तो बोलता जाहला आत्मजु । पंडुनृपाचा ।।२०।। कृष्णातें म्हणे अवधारिलें । आपण विश्वरूप मज दाविलें । तंव नवल म्हणोनि बिहालें । चित्त माझें ।।२१।। आणि इयें कृष्णमूर्तीची सवें । यालागीं सोय धरिली जीवें । तंव नको म्हणोनि देवें । वारिलें मातें ।।२२।। तरी व्यक्त आणि अव्यक्त । हें तूंचि एक निभ्रांत । भक्ती पाविजे व्यक्त । अव्यक्त योगें ।।२३।। या दोनी जी वाटा । तूंतें पावावया वैकुंठा । व्यक्ताव्यक्त दारवंठा । रिगिजे येथ ।।२४।। पैं जे वानी श्यातुका । तेचि वेगळिया वाला येका । म्हणोनि एकदेशीया व्यापका । सरिसा पाडु ।।२५।। अमृताचां सागरीं । जे लाभे सामर्थ्याची थोरी । तेचि दे अमृतलहरी । चुळी घेतलिया ।।२६।। हे कीर माझां चित्तीं । प्रतीति आथि जी निरुती । परी पुसणें योगपती । तें याचिलागीं ।।२७।। जें देवा तुम्हीं नावेक । अंगीकारिलें व्यापक । तें साचचि कीं कवतिक । हें जाणावया ।।२८।। तरी तुजलागिं कर्म । तूंचि जयांचें परम । भक्तीसि मनोधर्म । विकोनि घातला ।।२९।। इत्यादि सर्वींपरी । जे भक्त तूंतें हरीं । बांधोनियां जिव्हारीं । उपासिती ।।३०।। आणि जें प्रणवापैलीकडे । वैखरीयेसि जें कानडें । कायिसयाहि सांगडें । नव्हे जें वस्तु ।।३१।। तें अक्षर जी अव्यक्त । निर्देश देशरहित । सोहंभावें उपासित । ज्ञानिये जें ।।३२।। तयां आणि जी भक्तां । येरयेरांमाजीं अनंता । कवणें योगु तत्त्वतां । जाणितला सांगा ।।३३।। इया किरीटीचिया बोला । तो जगद्बंधु संतोषला । म्हणे हो प्रश्नु भला । जाणसी करूं ।।३४।।
श्रीभगवानुवाच
मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते ।
श्रद्धया परयोपेतास्ते मे युक्ततमा मता: ।।२।।
तरी अस्तुगिरीचां उपकंठी । रिगालिया रविबिंबापाठीं । रश्मी जैसे किरीटी । संचरती ।।३५।। वर्षाकाळीं सरिता । जैसी चढों लागे पंडुसुता । तैसी नीच नवी भजतां । श्रद्धा दिसे ।।३६।। परी ठाकिलियाहि सागरु । जैसा मागिलही यावा अनिवारु । तिये गंगेचिये ऐसा पडिभरु । प्रेमभावा ।।३७।। तैसें सर्वेंद्रियांसहित । मजमाजीं सूनि चित्त । जे रातिदिवो न म्हणत । उपासिती ।।३८।। यापरी जे भक्त । आपणपें मज देत । तेचि मी योगयुक्त । परम मानीं ।।३९।।
ये त्वक्षरमनिर्देश्यमव्यक्तं पर्युपासते ।
सर्वत्रगमचिन्त्यं च कूटस्थमचलं धु्रवम् ।।३।।
आणि येर तेही पांडवा । जे आरूढोनि सोहंभावा । झोंबती निरवयवा । अक्षरासि ।।४०।। मनाची नखी न लगे । जेथ बुद्धीची दृष्टी न रिगे । इंद्रिया कीर जोगें । काइ होईल ।।४१।। परी ध्यानाही कुवाडें । म्हणोनि एकें ठायी न संपडे । व्यक्तीसि माजिवडें । कवणेही नोहे ।।४२।। जया सर्वत्र सर्वपणें । सर्वांही काळीं असणें । जें पावूनि चिंतवणें । हिंपुटी जाहलें ।।४३।। जें होय ना नोहे । जें नाहीं ना आहे । ऐसे म्हणोनि उपाये । उपजतीचिना ।।४४।। जें चळे ना ढळे । सरे ना मैळे । तें आपुलेनिचि बळें । आंगविलें जिहीं ।।४५।।
संनियम्येन्द्रियग्रामं सर्वत्र समबुद्धय: ।
ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रता: ।।४।।
पैं वैराग्यमहापावकें । जाळूनि विषयांचीं कटकें । अधपलीं तवकें । इंद्रियें धरिलीं ।।४६।। मग संयमाची धाटी । सूनि मूरडिली उफराटीं । इंद्रियें कोंडिलीं कपाटीं । हृदयाचां ।।४७।। अपानींचिया कवाडा । लावोनि आसनमुद्रा सुहाडा । मूळबंधाचा हुडा । पन्नासिला ।।४८।। आशेचे लाग तोडिले । अधैर्याचे कडे झाडिले । निद्रेचें शोधिलें । काळवखें ।।४९।। वज्राग्नीचां ज्वाळीं । करूनि अपानधातूंची होळी । व्याधींचां सिसाळीं । पूजिलीं यंत्रें ।।५०।। मग कुंडलिनियेचा टेंभा । आधारीं केला उभा । तया चोजविलें प्रभा । निमथावरीं ।।५१।। नवद्वारांचां चौचकीं । बाणूनि संयतीची आडवंकी । उघडली खिडकी । ककारांतींची ।।५२।। प्राणशक्तिचामुंडे । प्रहारूनि संकल्पमेंढे । मनोमहिषाचेनि मुंडें । दिधली बळी ।।५३।। चंद्रसूर्यां बुझावणी । करूनि अनाहताची सुडावणी । सतरावियेचें पाणी । जिंतिलें वेगें ।।५४।। मग मध्यमा मध्यविवरें । तेणें कोरिवें दादरें । ठाकिलें चवरें । ब्रह्मरंध्रींचे ।।५५।। वरी मकारांत सोपान । तें सांडोनिया गहन । काखे सूनियां गगन । भरलें ब्रह्मीं ।।५६।। ऐसेनि जे समबुद्धी । मिळावया सोहंसिद्धी । आंगविताति निरवधी । योगदुर्गें ।।५७।। आपुलिया साटोवाटीं । शून्य घेती उठाउठी । तेही मातेंचि किरिटी । पावती गा ।।५८।। वांचूनि योगाचेनि बळें । अधिक कांहीं मिळें । ऐसें नाहीं आगळें । कष्टचि तया ।।५९।।
क्लेशोऽधिकतरस्तेषामव्यक्तासक्तचेतसाम् ।
अव्यक्ता हि गतिर्दु:खं देहवद्भिरवाप्यते ।।५।।
जिहीं सकळभूतांचां हितीं । निरालंबीं अव्यक्तीं । पसरलिया आसक्ती । भक्तीवीण ।।६०।। तयां महेंद्रादि पदें । करिताति वाटवधें । आणि ऋद्धिसिद्धींचीं द्वंद्वें । पडोनी ठाती ।।६१।। कामक्रोधांचे विलग । उठावती अनेग । आणि शून्येंसीं आंग । जुंझवावें कीं ।।६२।। ताहानें ताहानचि पियावी । भुकेलिया भूकचि खावी । अहोरात्र वावीं । मवावा वारा ।।६३।। उन्नीद्रेयाचें पहुडणें । निरोधाचें वेल्हावणें । झाडासि साजणें । चाळावें गा ।।६४।। शीत वेढावें । उष्ण पांघुरावें । वृष्टीचिया असावें । घराआंतु ।।६५।। किंबहुना पांडवा । हा अग्निप्रवेशु निच नवा । भातारेंवीण करावा । तो हा योगु ।।६६।। एथ स्वामीचें काज । ना बापिकें व्याज । परी मरणेंसीं झुंज । निच नवें ।।६७।। ऐसें मृत्यूहूनि तिख । कां घोटें कढत विख । डोंगर गिळितां मुख । न फाटे काई ।।६८।। म्हणोनि योगाचिया वाटा । जे निगाले गा सुभटा । तयां दु:खाचाचि वाटा । भागा आला ।।६९।। पाहें पां लोहाचे चणे । जैं बोचरिया पडती खाणें । तैं पोट भरणें की प्राणें । शुद्धी म्हणों ।।७०।। म्हणोनि समुद्र बाहीं । तरणें आथि केंही । कां गगनामाजीं पार्इं । खोलिजतु असे ।।७१।। वळघलिया रणाची थाटी । आंगीं न लगतां काठी । सूर्याची पाउटी । कां होय गा ।।७२।। यालागीं पांगुळा हेवा । नव्हे वायूसि पांडवा । तेविं देहवंतां जीवां । अव्यक्तीं गति ।।७३।। ऐसाही जरी धिंवसा । बांधोनियां आकाशा । झोंबती तरी क्लेशा । पात्र होती ।।७४।। म्हणोनि येर ते पार्था । नेणतीचि हे व्यथा । जे कां भक्तिपंथा । वोटंगले ।।७५।।
ये तु सर्वाणि कर्माणि मयि संन्यस्य मत्परा: ।
अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते ।।६।।
कर्मेंद्रियें सुखें । करिती कर्में अशेखें । जियें कां वर्णविशेखें । भागा आलीं ।।७६।। विधीतें पाळित । निषेधातें गाळित । मज देऊनि जाळित । कर्मफळें ।।७७।। ययापरी पाहीं । अर्जुना माझा ठाई । संन्यासूनि नाहीं । करिती कर्में ।।७८।। आणिकही जे जे सर्व । कायिक वाचिक मानसिक भाव । तयां मीवांचूनि धांव । अनौती नाहीं ।।७९।। ऐसे जे मत्पर । उपासिती निरंतर । ध्यानमिषें घर । माझें झाले ।।८०।। जयांचिये आवडी । केली मजशीं कुळवाडी । भोग मोक्ष बापुडीं । त्यजिलीं कुळें ।।८१।। ऐसे अनन्ययोगें । विकले जीवें मनें आंगें । तयांचें कायि एक सांगें । जें सर्व मी करी ।।८२।।
तेषामहं समुद्धर्ता मृत्युसंसारसागरात् ।
भवामि नचिरात्पार्थ मय्यावेशितचेतसाम् ।।७।।
किंबहुना धनुर्धरा । जो मातेचिया ये उदरा । तो मातेचा सोयरा । केतुला पां ।।८३।। तेवीं मी तयां । जैसे असती तैसियां । कळिकाळ नोकोनियां । घेतला पटा ।।८४।। ए-हवीं तरी माझियां भक्तां । आणि संसाराची चिंता । काय समर्थाची कांता । कोरान्न मागे ।।८५।। तैसे तें माझें । कलत्र हें जाणिजे । कयिसेनिही न लाजे । तयांचेनि मी ।।८६।। जन्ममृत्यूचां लाटीं । झळंबती इया सृष्टी । तें देखोनियां पोटीं । ऐसें जाहलें ।।८७।। भवसिंधूचेनि माजें । कवणासि धाकु नुपजे । येथ जरी कीं माझे । बिहिती हन ।।८८।। म्हणोनि गा पांडवा । मूर्तीचा मेळावा । करूनि त्यांचिया गांवा । धांवतु आलों ।।८९।। नामाचिया सहस्रवरी । नावा इया अवधारीं । सजूनियां संसारीं । तारूं जाहलों ।।९०।। सडे जे देखिले । ते ध्यानकासे लाविले । परीग्रही घातले । तरियावरी ।।९१।। प्रेमाची पेटी । बांधली एकाचां पोटीं । मग आणिले तटीं । सायुज्याचां ।।९२।। परी भक्तांचेनि नांवें । चतुष्पदादि आघवें । वैकुंठीचिये राणिवे । योग्य केले ।।९३।। म्हणोनि गा भक्तां । नाहीं एकही चिंता । तयांतें समुद्धर्ता । आथि मी सदा ।।९४।। आणि जेव्हांचि कां भक्तीं । दिधली चित्तवृत्ती । तेव्हांचि मज सूति । तयांचिये नाटीं ।।९५।। याकारणें गा भक्तराया । हा मंत्र तुवां धनंजया । कीजे जे यया । मार्गा भजिजे ।।९६।।
मय्येव मन आधत्स्व मयि बुद्धिं निवेशय ।
निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वं न संशय: ।।८।।
अगा मानस हें एक । माझां स्वरूपीं वृत्तिक । करूनि घालीं निष्टंक । बुद्धि निश्चयेंसीं ।।९७।। इयें दोनीं सरिसीं । मजमाजीं प्रेमेंसीं । रिगालीं तरी पावसी । मातें तूं गा ।।९८।। जे मनबुद्धि इहीं । घर केलें माझां ठायीं । तरी सांगें मग काई । मी तूं ऐसें उरे ।।९९।। म्हणोनि दीवा पालवे । सवेंचि तेज मालवें । का रविबिंबासवें । प्रकाशु जाय ।।१००।। उचललेया प्राणासरिसीं । इंद्रियेंही निगती जैसीं । तैसा मनोबुद्धिपासीं । अहंकारु ये ।।१।। म्हणोनि माझां स्वरूपीं । मनबुद्धी इयें निक्षेपीं । येतुलेनि सर्वव्यापी । मीचि होसी ।।२।। यया बोला कांहीं । अनारिसें नाहीं । आपली आण पाहीं । वाहतु असे गा ।।३।।
अथ चित्तं समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम् ।
अभ्यासयोगेन ततो मामिच्छाप्तुं धनंजय ।।९।।
अथवा हें चित्त । मनबुद्धिसहित । माझां हातीं अचुंबित । न शकसी देवों ।।४।। तरी गा ऐसें करीं । या आठां पाहारांमाझारीं । मोटकें निमिषभरी । देतु जाय ।।५।। मग जें जें कां निमिख । देखेल माझें सुख । तेतुलें अरोचक । विषयीं घेईल ।।६।। जैसा शरत्कालु रिगे । आणि सरिता वोहटूं लागे । तैसें चित्त काढेल वेगें । प्रपंचौनी ।।७।। मन पुनवेहूनि जैसें । शशिबिंब दिसें दिसें । हारपत अंवसे । नाहींचि होय ।।८।। तैसें भोगाआंतूनि निगतां । चित्त मजमाजीं रिगतां । हळू हळू पंडुसुता । मीचि होईल ।।९।। अगा अभ्यासयोगु म्हणिजे । तो हा एकु जाणिजे । येणें कांहीं न निपजे । ऐसें नाहीं ।।११०।। पैं अभ्यासाचेनि बळें । एकां गति अंतराळें । व्याघ्र सर्प प्रांजळे । केले एकीं ।।११।। विष कीं आहारीं पडे । समुद्रीं पायवाट जोडे । एकीं वाग्ब्रह्म थोकडें । अभ्यासें केलें ।।१२।। म्हणोनि अभ्यासासि कांहीं । सर्वथा दुष्कर नाहीं । यालागिं माझां ठायीं । अभ्यासें मिळें ।।१३।।
अभ्यासेऽप्यसमर्थोऽसि मत्कर्मपरमो भव ।
मदर्थमपि कर्माणि कुर्वन्सिद्धिमवाप्स्यसि ।।१०।।
कां अभ्यासाही लागीं । कसु नाहीं तुझां आंगीं । तरी आहासी जया भंगीं । तैसाचि अस ।।१४।। इंद्रियें न कोंडीं । भोगातें न तोडीं । अभिमानु न संडीं । स्वजातीचा ।।१५।। कुळधर्मु चाळीं । विधिनिषेध पाळीं । मग सुखें तुज सरळी । दिधलीं आहे ।।१६।। परी मनें वाचा देहें । जैसा जो व्यापारु होंये । तो मी करीतु आहें । ऐसें न म्हणें ।।१७।। करणें कां न करणें । हें आघवें तोचि जाणे । विश्व चळतसे जेणें । परमात्मेंनि ।।१८।। उणयापुरेयाचें कांही । उरों नेदीं आपुलां ठायीं । स्वजातीचि करूनि घेर्इं । जीवित हे ।।१९।। माळियें जेउतें नेलें । तेउतें निवांतचि गेलें । तया पाणीया ऐसें केलें । होआवें गा ।।१२०।। ए-हवीं तरी सुभटा । उजू कां अव्हांटा । रथु काई खटपटा । करितु असे ।।२१।। म्हणोनि प्रवृत्ति आणि निवृत्ती । इयें वोझीं नेघें मती । अखंड चित्तवृत्ति । आठवीं मातें ।।२२।। आणि जें जें कर्म निपजे । तें थोडें बहु न म्हणिजे । निवांतचि अर्पिजे । माझां ठायीं ।।२३।। ऐसिया मद्भावना । तनुत्यागीं अर्जुना । तूं सायुज्यसदना । माझिया येसी ।।२४।।
अथैतदप्यशक्तोऽसि कर्तुं मद्योगमाश्रित: ।
सर्वकर्मफलत्यागं तत: कुरु यतात्मवान् ।।११।।
ना तरी हेंही तुज । नेदवे कर्म मज । तरी गा तूं भज । पंडुकुमरा ।।२५।। बुद्धीचां पाठीं पोटीं । कर्माआदि कां शेवटीं । मातें बांधणें किरीटी । दुवाड जरी ।।२६।। तरी हेहीं असो । सांडीं माझा अतिसो । परी संयतिसीं वसो । बुद्धि तुझी ।।२७।। आणि जेणें जेणें वेळे । घडती कर्में सकळें । तयांचीं तियें फळें । त्यजितु जाय ।।२८।। वृक्ष कां वेली । लोटती फळें आलीं । तैसीं सांडीं निपजलीं । कर्में सिद्धें ।।२९।। परी मातें मनीं धरावें । कां मजउद्देशें करावें । हें कांहीं नको आघवें । जाऊं दे शून्यीं ।।१३०।। खडकीं जैसें वर्षलें । कां आगीमाजीं पेरिले । कर्म मानीं देखिलें । स्वप्न जैसें ।।३१।। अगा आत्मजेचां विषीं । जीवु जैसा निरभिलाषी । तैसा कर्मीं अशेषीं । निष्कामु होर्इं ।।३२।। वन्हीची ज्वाळा जैसी । वाया जाय आकाशीं । क्रिया जिरोंदे तैसी । शून्यामाजीं ।।३३।। अर्जुना हा फलत्यागु । आवडे कीर असलगु । परी योगामाजीं योगु । धुरेचा हा ।।३४।। येणें फलत्यागें सांडे । तें तें कर्म न विरुढे । एकचि वेळे वेळु झाडें । वांझें जैसीं ।।३५।। तैसें येणेंचि शरीरें । शरीरा येणें सरे । किंबहुना येरझारें । चिरा पडे ।।३६।। पैं अभ्यासाचां पाउटीं । ठाकीजे ज्ञान किरीटी । ज्ञानें येइजे भेटी । ध्यानाचिये ।।३७।। मग ध्यानासि खेंव । देती आघवेचि भाव । तेव्हां कर्मजात सर्व । दूरी ठाके ।।३८।। कर्म जेथ दुरावें । तेथ फलत्यागु संभवे । त्यागास्तव आंगवे । शांति सगळी ।।३९।। म्हणोनि यावया शांति । हाचि अनुक्रमु सुभद्रापती । अभ्यासुचि प्रस्तुतीं । करणें एथ ।।१४०।।
श्रेयो हि ज्ञानमभ्यासाज्ज्ञानाद्ध्यानं विशिष्यते ।
ध्यानात्कर्मफलत्यागस्त्यागाच्छान्तिरनन्तरम् ।।१२।।
अभ्यासाहूनि गहन । पार्था मग ज्ञान । ज्ञानापासोनि ध्यान । विशेषिजे ।।४१।। मग कर्मफलत्यागु । तो ध्यानापासोनि चांगु । त्यागाहूनि भोगु । शांतिसुखाचा ।।४२।। ऐसिया या वाटा । इहींचि पेणां सुभटा । शांतीचा माजिवटा । ठाकिला जेणें ।।४३।।
अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र: करुण एव च ।
निर्ममो निरहंकार: समदु:खसुख: क्षमी ।।१३।।
जो सर्व भूतांचां ठायीं । द्वेषातें नेणेचि कहीं । आपपरु नाहीं । चैतन्या जैसा ।।४४।। उत्तमातें धरिजे । अधम तरी अव्हेरिजे । हें कांहींचि नेणिजे । वसुधा जेवीं ।।४५।। कां रायाचें देह चाळूं । रंका परौतें गाळूं । हें न म्हणेचि कृपाळु । प्राणु पैं गा ।।४६।। गाईची तृषा हरूं । कां व्याघ्रा विष होऊनि मारूं । ऐसें नेणेचि कां करूं । तोय जैसें ।।४७।। तैसी आघवांचि भूतमात्रीं । एकपणें जया मैत्री । कृपेसि धात्री । आपणपां जो ।।४८।। आणि मी तूं हे भाष नेणे । माझें कांहींचि न म्हणे । सुखदु:ख जाणणें । नाहीं जया ।।४९।। तेवींचि क्षमेलागीं । पृथ्वीसि पवाडु आंगीं । संतोषा उत्संगीं । दिधलें घर ।।१५०।।
संतुष्ट: सततं योगी यतात्मा दृढनिश्चय: ।
मय्यर्पितमनोबुद्धिर्यो मद्भक्त: स मे प्रिय: ।।१४।।
वार्षियेवीण सागरु । जैसा जळें नित्य निर्भरु । तैसा निरुपचारु । संतोषी जो ।।५१।। वाहूनि आपुली आण । धरी जो अंत:करण । निश्चया साचपण । जयाचेनी ।।५२।। जीवु परमात्मा दोन्ही । बैसोनि ऐक्यासनीं । जयाचां हृदयभुवनीं । विराजती ।।५३।। ऐसा योगसमृद्धि । होऊनि जो निरवधि । अर्पी मनोबुद्धि । माझां ठायीं ।।५४।। आंतु बाहेरि योगु । निर्वाळलेयाही चांगु । तरी माझा अनुरागु । सप्रेम जया ।।५५।। अर्जुना गा तो भक्तु । तोचि योगी तोचि मुक्तु । तो वल्लभा मी कांतु । ऐसा पढिये ।।५६।। हें ना तो आवडे । मज जीवाचेनि पाडें । हेंही एथ थोडें । रूप करणें ।।५७।। तरी पढियंतयाची कहाणी । हे भुलीची भारणी । इयें तंव न बोलणीं । परी बोलवी श्रद्धा ।।५८।। म्हणोनि गा आम्हां । वेगा आली उपमा । ए-हवीं काय प्रेमा । अनुवादु असे ।।५९।। आतां असो हें किरीटी । पैं प्रियाचिया गोष्टी । दुणा थांव उठी । आवडी गा ।।१६०।। तयाही वरी विपायें । प्रेमळु संवादिया होये । तिये गोडीसि आहे । कांटाळें मग ।।६१।। म्हणोनि गा पांडुसुता । तूंचि प्रियु आणि तूंचि श्रोता । वरी प्रियाची वार्ता । प्रसंगें आली ।।६२।। तरी आतां बोलों । भलें या सुखा मीनलों । ऐसें म्हणतखेंवी डोलों । लागले देवो ।।६३।। मग म्हणे जाण । तया भक्ताचें लक्षण । जया मी अंत:करण । बैसों घालीं ।।६४।।
यस्मान्नोद्विजते लोको लोकान्नोद्विजते च य: ।
हर्षामर्षभयोद्वेगैर्मुक्तो य: स च मे प्रिय: ।।१५।।
तरी सिंधूचेनि माजें । जळचरां भय नुपजे । आणि जळचरीं नुबगिजे । समुद्र जैसा ।।६५।। तेविं उन्मत्तें जगें । जयासि खंती न लगे । आणि जयाचेनि आंगें । न शिणे लोकु ।।६६।। किंबहुना पांडवा । शरीर जैसें अवयवां । तैसा नुबगे जीवां । जीवपणें जो ।।६७।। जगचि देह जाहलें । म्हणोनि प्रियाप्रिय गेलें । हर्षामर्ष ठेले । दुजेनविण ।।६८।। ऐसा द्वंद्वनिर्मुक्तु । भयोद्वेगरहितु । याहि वरि भक्तु । माझां ठायीं ।।६९।। तरी तयाचा गा मज मोहो । काय सांगों तो पाढियावो । हें असो जिवें जीवो । माझेनि तो ।।१७०।। जो निजानंदें धाला । परिणामु आयुष्या आला । पूर्णते जाहला । वल्लभु जो ।।७१।।
अनपेक्ष: शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथ: ।
सर्वारम्भपरित्यागी यो मद्भक्त: स मे प्रिय: ।।१६।।
जयाचां ठायीं पांडवा । अपेक्षे नाहीं रिगावा । सुखासि चढावा । जयाचें असणें ।।७२।। मोक्ष देऊनि उदार । काशी होय कीर । परी वेंचणें लागे शरीर । तिये गांवी ।।७३।। हिमवंतु दोष खाये । परी जीविताची हानी होये । तैसें शुचित्व नोहे । सज्जनाचें ।।७४।। शुचित्वें शुचि गांग होये । आणि पाप तापही जाये । परी तेथें आहे । बुडणें एक ।।७५।। खोलिये पारु नेणिजे । तरी भक्तीं न बुडिजे । रोकडाचि लाहिजे । न मरतां मोक्षु ।।७६।। संतांचेनि अंगलगें । पापातें जिणणें गंगे । तेणे संतसंगें । शुचित्व कैसें ।।७७।। म्हणोनि असो जो ऐसा । शुचित्वें तीर्था कुवासा । जेणें लंघविलें दिशा । मनोमळ ।।७८।। आंतु बाहेरी चोखाळु । सूर्य तैसा उजाळु । आणि तत्त्वार्थींचा पायाळु । देखणा जो ।।७९।। व्यापक आणि उदास । जैसें कां आकाश । तैसें जयाचें मानस । सर्वत्र गा ।।१८०।। संसारव्यथें फिटला । जो नैराश्यें विनटला । व्याधा हातोनि सुटला । विहंगमु जैसा ।।८१।। तैसा सतत जो सुखें । कोणीही टवंच न देखे । नेणिजे गतायुषें । लज्जा जेवीं ।।८२।। आणि कर्मारंभालागीं । जया अहंकृती नाहीं आंगीं । जैसा निरिंधन आगी । विझोनि जाय ।।८३।। तैसा उपशमुचि भागा । जयासि आला पैं गा । जो मोक्षाचिया आंगा । लिहिला असे ।।८४।। अर्जुना हा ठावोवरी । जो सोहंभावो सरोभरी । तो द्वैताचां पैलतीरीं । निगों सरला ।।८५।। कीं भक्तिसुखालागीं । आपणपेंचि दोहीं भागीं । वाटूनियां आंगीं । सेवकैं बाणी ।।८६।। येरा नाम मी ठेवी । मग भजती वोज बरवी । न भजतया दावी । योगिया जो ।।८७।। तयाचें आम्हां व्यसन । आमुचें तो निजध्यान । किंबहुना समाधान । तो मिळे तैं ।।८८।। तयालागीं मज रूपा येणें । तयाचेनि मज एथें असणें । तया लोण कीजे जीवें प्राणें । ऐसा पढिये ।।८९।।
यो न हृष्यति न द्वेष्टि न शोचति न कांक्षति ।
शुभाशुभपरित्यागी भक्तिमान्य: स मे प्रिय: ।।१७।।
जो आत्मलाभासारिखें । गोमटें कांहींचि न देखे । म्हणोनि भोगविशेखें । हरिखेजेना ।।१९०।। आपणचि विश्व जाहला । तरी भेदभाव सहजचि गेला । म्हणोनि द्वेषु ठेला । जया पुरुषा ।।९१।। पैं आपुलें जें साचें । तें कल्पांतींही न वचें । हें जाणोनि गताचें । न शोची जो ।।९२।। आणि जयापरौतें कांहीं नाहीं । तें आपणपेंचि आपुलां ठायीं । जाहला यालागीं जो कांहीं । आकांक्षी ना ।।९३।। वोखटें कां गोमटें । हें कांहींचि तया नुमटे । रात्रिदिवस न घटे । सूर्यासि जेवीं ।।९४।। ऐसा बोधुचि केवळु । जो होऊनि असे निष्कळु । त्याहीवरी भजनशीळु । माझां ठायीं ।।९५।। तरी तया ऐसें दुसरें । आम्हां पढियंतें सोयरें । नाहीं गा साचोकारें । तुझी आण ।।९६।।
सम: शत्रौ च मित्रे च तथा मानापमानयो: ।
शीतोष्णसुखदु:खेषु सम: संगविवर्जित: ।।१८।।
पार्था जयाचां ठायीं । वैषम्याची वार्ता नाहीं । रिपुमित्रां दोहीं । सरिसा पाडु ।।९७।। कां घरींचियां उजियेडु करावा । पारखियां आंधारु पाडावा । हें नेणेचि गा पांडवा । दीपु जैसा ।।९८।। जो खांडावया घावो घाली । कां लावणी जयानें केली । दोघां एकचि साउली । वृक्षु दे जैसा ।।९९।। ना तरी इक्षुदंडु । पाळितया गोडु । गाळितया कडु । नोहेचि जेवीं ।।२००।। अरिमित्रीं तैसा । अर्जुना जया भावो ऐसा । मानापमानीं सरिसा । होतु जाय ।।१।। तिहीं ऋतूं समान । जैसें कां गगन । तैसे एकचि मान । शीतोष्णीं जया ।।२।। दक्षिण उत्तर मारुता । मेरु जैसा पंडुसुता । तैसा सुखदु:खप्राप्तां । मध्यस्थु जो ।।३।। माधुर्ये चंद्रिका । सरिसी राया रंका । तैसा जो सकळिकां । भूतां समु ।।४।। आघविया जगा एक । सेव्य जैसें उदक । तैसें जयातें तिन्ही लोक । आकांक्षिती ।।५।। जो सबाह्यसंगु । सांडोनिया लागु । एकाकी असे आंगु । आंगीं सूनीं ।।६।।
तुल्यनिन्दास्तुतिर्मौनी संतुष्टो येन केनचित् ।
अनिकेत: स्थिरमतिर्भक्तिमान्मे प्रियो नर: ।।१९।।
जो निंदेतें नेघे । स्तुती न श्लाघे । आकाशा न लगे । लेपु जैसा ।।७।। तैसें निंदे आणि स्तुती । मानु करूनि एके पांती । विचरे प्राणवृत्ती । जनीं वनीं ।।८।। साच लटिकें दोन्हीं । बोलोनि न बोले जाहला मौनी । जे भोगितां उन्मनी । आरायेना ।।९।। जो यथालाभें न तोखे । अलाभें न पारुखे । पाउसेंवीण न सुके । समुद्रु जैसा ।।२१०।। आणि वायूसि एके ठायीं । बिढार जैसें नाहीं । तैसा न धरीच केंहीं । आश्रयो जो ।।११।। आघवाचि आकाशस्थिती । जेविं वायूसि नित्य वस्ती । तेविं जगचि विश्रांति- । स्थान जया ।।१२।। हें विश्वचि माझें घर । ऐसी मती जयाची स्थिर । किंबहुना चराचर । आपण जाहला ।।१३।। मग यावरीही पार्था । माझां भजनीं आस्था । तरी तयातें मीं माथां । मुकुट करीं ।।१४।। उत्तमासि मस्तक । खालविजे हें काय कौतुक । परी मानु करिती तिन्ही लोक । पायवणियां ।।१५।। तरी श्रद्धावस्तूशीं आदरु । करितां जाणिजे प्रकारु । जरी होय श्रीगुरु । सदाशिवु ।।१६।। परी हें असो आतां । महेशातें वानितां । आत्मस्तुती होतां । संचारु असे ।।१७।। ययालागीं हें नोहे । म्हणितलें रमानाहें । अर्जुना मी वाहें । शिरीं तयातें ।।१८।। जे पुरुषार्थसिद्धी चौथी । घेऊनि आपुलां हातीं । रिगाला भक्तिपंथीं । जगा देतु ।।१९।। कैवल्याचा अधिकारी । मोक्षाची सोडी बांधी करी । कीं जळाचिये परी । तळवटु घे ।।२२०।। म्हणोनि गा नमस्कारूं । तयातें आम्ही माथां मुकुट करूं । तयाची टांच धरूं । हृदयीं आम्ही ।।२१।। तयाचिया गुणांची लेणीं । लेववूं आपुलिये वाणीं । तयाची कीर्ती श्रवणीं । आम्ही लेऊं ।।२२।। तो पहावा हे डोहळे । म्हणोनि अचक्षुसी मज डोळे । हातींचेनि लीलाकमळें । पुजूं तयातें ।।२३।। दोंवरी दोनी । भुजा आलों घेउनी । आलिंगावयालागुनी । तयाचें आंग ।।२४।। तया संगाचेनि सुरवाडें । मज विदेहा देह धरणें घडे । किंबहुना आवडे । निरुपमु ।।२५।। तेणेंसी आम्हा मैत्र । एथ कायसें विचित्र । परी तयाचें चरित्र । ऐकती जे ।।२६।। तेही प्राणापरौते । आवडती हें निरुतें । जे भक्तचरित्रातें । प्रशंसिती ।।२७।। जें हें अर्जुना साद्यंत । सांगितले प्रस्तुत । भक्तियोगु समस्त । योगरूप ।।२८।। जे मी प्रीति करीं । कां मनीं शिरसा धरीं । येवढी थोरी । जये स्थितीये ।।२९।।
ये तु धर्म्यामृतमिदं यथोक्तं पर्युपासते ।
श्रद्दधाना मत्परमा भक्तास्तेऽतीव मे प्रिया: ।।२०।।
ते हे गोष्टी रम्य । अमृतधारा धर्म्य । करिती प्रतीतिगम्य । आइकोनि जे ।।२३०।। तैसीचि श्रद्धेचिनि आदरें । जयांचां ठायीं विस्तरे । जीवीं जयां थारे । जे अनुष्ठिती ।।३१।। परी निरूपली जैसी । तैसीच स्थिती मानसीं । मग सुक्षेत्रीं जैसी । पेरणी केली ।।३२।। परी मातें परम करूनि । इये अर्थीं प्रेम धरूनि । हेंचि सर्वस्व मानूनि । घेती जे पैं ।।३३।। पार्था गा जगीं । तेचि भक्त तेचि योगी । उत्कंठा तयांलागीं । अखंड मज ।।३४।। ते तीर्थ ते क्षेत्र । जगीं तेचि पवित्र । भक्तिकथेसि मैत्र । जयां पुरुषां ।।३५।। आम्ही तयाचें करूं ध्यान । तो आमुचें देवतार्चन । तेवांचूनि आन । गोमटें नाहीं ।।३६।। तयाचें आम्हां व्यसन । तो आमुचें निधिनिधान । किंबहुना समाधान । तो मिळे तैं ।।३७।। पैं प्रेमळाची वार्ता । जे अनुवादती पंडुसुता । ते मानूं परमदेवता । आपुली आम्ही ।।३८।। ऐसें निजजनानंदें । तेणें जगदादिकंदें । बोलिलें मुकुंदें । संजयो म्हणे ।।३९।। राया जो निर्मळु । निष्कल लोककृपाळु । शरणागतां प्रतिपाळु । शरण्यु जो ।।२४०।। जो धर्मकीर्तिधवळु । अगाधदातृत्वें सरळु । अतुळबळें प्रबळु । बळिबंधनु ।।४१।। जो पैं सुरसहायशीळु । लोकलालनलीळु । प्रणतप्रतिपाळु । हा खेळु जयाचा ।।४२।। जो भक्तजनवत्सलु । प्रेमळजनप्रांजळु । सत्यसेतु सरळु । कलानिधी ।।४३।। तो कृष्ण जी वैकुंठीचा । चक्रवर्ती निजांचा । सांगतुसे येरु दैवाचा । आइकतु असे ।।४४।। आतां ययावरी । निरूपिती परी । संजयो म्हणे अवधारीं । धृतराष्ट्रातें ।।४५।। तेचि रसाळ कथा । मऱ्हाठिया प्रतिपथा । आणिजेल आतां । अवधारिजो ।।४६।। ज्ञानदेव म्हणे तुम्ही । संत वोळगावेति आम्ही । हें पढविलों जी स्वामी । निवृत्तिदेवें ।।२४७।।
ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां
योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे भक्तियोगो नाम द्वादशोऽध्याय: ।।१२।।
।। श्री ज्ञानेश्वरी अध्याय बारावा समाप्त ।। (श्लोक २०, ओव्या २४७)
।। पुंडलिक वरदाऽऽ हरि विठ्ठल श्रीऽऽ ज्ञानदेव तुकाऽऽराम ।।